Wednesday 5 February 2014

सुजनवाक्य - ||मग मानिती सकळ ||

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक व साहित्य प्रसारास प्रारंभ
सुजनवाक्य - ||मग मानिती सकळ ||
प्रत्येकाच्या मनात एक उर्मी असते , कि मला लोकांनी मानावे . लोकांनी मानावे याकरिता मनसे नाना प्रकारचे खटाटोप करीत असतात . आपला नावलौकिक व्हावा याकरिता प्रयत्नशील असतात . काहीच कार्य न करिता कार्यकर्ता म्हणवणारे कार्यकर्ते काही कमी नाहीत . कार्य करणार नाहीत ; पण फोटोच्या वेळेस वेळेवर हजर होणारेही कमी नाहीत . अशाने कीर्ती वाढत नाही . अंगी गुण असतील तर हे खटाटोप न करता देखील लोक मानतील , असे जगद्गुरू तुकाराम महराज आपल्याला एका अभंगात सांगतात .

नसावे ओशाळ | मग मानिती सकळ ||- तुकाराम महाराज

जो ओशाळ आहे , त्याला कदापि कीर्ती प्राप्त होणार नाही . मनात जर आशा वास करीत असेल , तर अशा आशा बद्ध माणसाला स्वार्थ सुटणार नाही . मग अशा स्वार्थी माणसाला कोण मानणार ? त्याकरिता प्रथम आपण ओशाळ नसावे . मग अपोआप लोक आपल्याला मानू लागतील .

जय तेथे पावे मन | चाले बोलिले वचन || - तुकाराम महाराज

केवळ त्याला मान मिळत नाही , तर तो जाईल तिकडे त्याच्या मागे मान फिरत असतो . तो स्वार्थी नसल्यामुळे तसेच त्याचे जीवन प्ररार्थी झालेले असल्यामुळे तो जे बोलेल ते वचन समाज मान्य करतो . कारण नि : स्पृह माणसाचे जीवन हे सर्व समाजाकरताच असते . 'उरलो उपकारापुरता ' या बोधावर ते असतात .

राहो नेदी बाकी | दान ज्याचे त्यासी टाकी || -तुकाराम महाराज

सेवा करणाऱ्या व्यक्तीला त्याची पोहच देण्याची वृत्ती त्याच्या ठायी निर्माण होते . तो कोणाचे ऋण ठेवीत नाही . ज्याचे त्याचे दान त्या त्या व्यक्तीच्या पदरात टाकतो . अशा व्यक्तीला सर्वचजण मानतात .
व्हावा वाटे जना | तुका म्हणे साठी गुणा ||- तुकाराम महाराज
जग अशा व्यक्तीला मानते . ती व्यक्ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते . त्याच्या जवळ असणारे गुण यास कारणीभूत असतात . गुनिजनालाच कीर्ती माळ घालते . थोडक्यात , समजा कोणाला मानतो ? जो ओशाळ नाही , जो समाजाचे ऋण ठेवीत नाही , ज्याच्या ठायी सद्गुण आहेत , अशालाच समाज मानतो . आज लोकेषणा असणाऱ्या व्यक्तींना हा तुय्काराम महाराजांचा उपदेश बोधप्रद ठरावा असाच आहे .

सदरहू चिंतन गुरुवर्य श्री महंत प्रमोद महाराज जगताप यांच्या सुजनवाक्य या ग्रंथरुपी पुस्तकातील आहे .
जास्तीत जास्त लोकांपर्यंत वारकरी साहित्य पोहचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे .
 अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य - अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ .