Tuesday 25 March 2014

सुजनवाक्य :- " प्रपंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल || " - श्री महंत प्रमोद महाराज जगताप

सुजनवाक्य :- 


" प्रपंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल || "

पारमार्थिक जीवन जगत असताना अनेक साधकांचे दुर्लक्ष होते .
एकांगी परमार्थ करीत हि साधक मंडळी शेवटी कष्टी होतात , असे श्री स्वामी महराज म्हणतात .
प्रोंच सांडोनी परमार्थ कराल | तेणे तुम्ही कष्टी व्हाल |
प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||

परमार्थ जरी करीत असला तरीसुद्धा अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा आल्याच . त्या पूर्ण करताना साधकाची त्रेधातिरपीट उडते . महाराज म्हणतात अगदी संन्यासी जरी असला तरी त्याला दुपारी बारा वाजता दोन घास अन्न पाहिजेच .

जरी झाला सन्यासी | तरी माध्यानासी तोंड वासी ||

लज्जा रक्षणाकरिता आणि शरीर संरक्षणयाकरिता वस्त्र पाहिजे .विश्रांती करिता निवारा पाहिजे . पारमार्थिक झाला तरी त्याला प्रपंच आहेच . तो टाकून कसा चालेल ? आणि जर प्रपंच सोडून परमार्थ करायचा म्हटला तरी त्यात कष्ट भोगावे लागतील . जर परमार्थ व प्रपंच यांची सांगड घातली तरच तो विवेकी मनुष्य होय .

प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||

श्री समर्थ रामदास स्वामी महाराज पुढील ओवीत मोठ मार्मिक वर्णन करतात .

प्रपंच सांडून परमार्थ केला | तरी अन्न मिळेना खायला |
मगतया करंट्याला | परमार्थ कैंचा || - दासबोध
.
प्रपंचाकडे पाठ फिरवून नुसताच परमार्थ करीत बसलात तर खायला दुपारी अन्न सुद्धा मिळणार नाही ; मग अशा कमनशिबी माणसाला परमार्थ कसा बरे साध्य होईल ? श्री संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा एका ठिकाणी सुंदर उपदेश करतात :

का सोडिसी गृह आश्रम | का संडिसी कुळीचे धर्म ||

हा सुंदर असा गृहस्थाश्र्म का सोडतोस ? कुळीचे कुलधर्म का त्यागतोस ? हा प्रपंच परमार्थाच्या आड येणार नाही . फक्त प्रपंचात रममाण न होता , त्यातच रत न होता परमार्थ हि करावा .
हि एक बाजू झाली , आता ण परमार्थ न करिता केवळ प्रपंचात रमणारे जे लोक आहेत त्यांचा हि स्वामी महाराजांनी विचार सांगितला आहे .
धन्यवाद .
 वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य