Thursday 17 July 2014

१२ व्या शतकात सांगितले खगोलशास्त्र - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

 
      अकराव्या अध्यायाच्या आरंभी या अध्यायामधे शांत आणि अद्भुत रस एकत्र आले आहेत हे सांगताना म्हटले आहे ,
                          नातरी अवसेचा दिवशी | भेटली बिंबे दोनी जैशी |
                          तेवी एकवळा रसी | केला एथ || - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ११-०५
 अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या एकीकडेच असतात , जणू काय ते एकमेकांना भेटतात .( त्याप्रमाणे  शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस या अध्यायात एकमेकांना भेटले आहेत )
                   वद्य पक्षात कमी कमी होत अमावस्येला रात्री चंद्र संपलेला नसतो तर त्या दिवशी तो सूर्याबरोबरच उगवतो , मावळतो , त्यामुळे अमावस्येला रात्री आकाशात चंद्र दिसत नाही , हे वैज्ञानिक सत्य सांगितले आहे .
                    चंद्राच्या दिसणाऱ्या कला या दृश्यभास असतात म या कला चंद्र , सूर्य आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणामुळे बदलणाऱ्या जागांच्या परस्पर सापेक्षतेच्या परिणामाने दिसतात , चंद्र आणि त्यांच्या या कलांचा हा संकेत भगवंताचे समत्व सांगताना उदाहरण म्हणून सांगितला आहे .
                  हा गा पूर्णिमेआधी कायी | चंद्र सावयवुचि नाही |
                        परी तिये दिवशी भेटे पाही | पूर्णता तया ||          
                                                          - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ - ११२७
पुर्निमेआधी चंद्राचे पूर्णबिंब दिसत नसले तरी चंद्रबिंब पूर्ण नसते काय ? अर्थात असतेच . पण पुर्निमेच्या दिवशी त्याचे  पूर्णबिंब दिसते
                संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                          आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र