आज भाद्रपद वद्य षष्ठी - ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती
याच दिवशी संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली .
संत बहिणाबाई कृत ज्ञानदेवीची आरती
जय माय ज्ञानदेवी । शब्द रत्न जान्हवी ।
प्राशिता तोय तुझे । सुख होतसे जीवी ।। धृ ।।
अनर्घ्य सार रत्ने । सिंधू मथुनी गीता ।
काढिली भूषणासी । वैराग्यभाग्यवंता ।।२।।
अमृतसर ओवी । शुद्ध सेविता जीवी ।
जीवची ब्रह्म होती । अर्थ ऐकता तेही ।।३।।
नव्हती अक्षरे ही । निजनिर्गुणभुजा ।
बहेणी क्षेम देती । अर्थ ऐकता वोजा ।। ४।।