।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
श्रीसंत साहित्य सेवा संघ सोलापूर तर्फे "पुरुषोत्तम संत सेवा पुरस्कार " ह भ प प्रा सरलताई बाबर ,बारामती यांना डॉ लताताई भिशीकर यांचे हस्ते समारंभपूर्वक प्रदान करणेत आला. वै सोनोपंत दांडेकर ,ह भ प काळे महाराज आणि स्वामी माधवनाथ पुणे यांचे मार्गदर्शन सरलताईंना लाभले आणि त्याच बळावर सरलताईंनी बारामती व ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा प्रसाराचे मोठे कार्य केल्याचे लताताईंनी सांगितले. सन्माननिधी,मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.या समयी स्नेहा शिनखेडे लिखित "आनंदाचा कंद " पुस्तकाचे प्रकाशन करणेत आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुसूरकर यांनी केले.
सत्कारास उत्तर देताना सरलताईनी संत तुकाराम महाराज यांच्या "आजिचे हे मज तुम्ही कृपादान , दिले संतजन मायबापी !"या अभंगावर निरूपण केले.संत प्रतिभेचा व साहित्याचा गौरव या नात्याने हा पुरस्कार स्वीकारत असलेचे विनम्रपणे नमूद केले.कार्यक्रमास अण्णासाहेब ताम्हनकर,सुनील शिनखेडे, सु स देशमुख,श्री अ लिमये,रमेश विश्वरुपे,विश्वास जतकर,रघुनाथ कुलकर्णी उपस्थित होते