पूज्य कर्मवीर अण्णांची एक आठवण - पेढे
हायस्कुल स्कॉलशीप ला प्रा. शिवाजीराव भोसले प्रथम आले , त्यांच्या यशाचं वर्तमान कर्मवीर अण्णा ना समझल . व त्यांनी शिवाजी रावाना बोलवलं व म्हटले पेढे कुठेत , शिवाजी राव शांतच ..म्हटले अरे तू या संस्थेत येऊन एक वर्ष झालं ना ? प्राचार्य शांत उभे होते व ते म्हटले अण्णा मला तुमच्या बोलण्याचा बोध होत नाही . त्यावर ते म्हणाले आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक वस्ती गृहा मध्ये पेढे या शब्दाला विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे . आणि तो आपल्या संस्थेपुरता मर्यादित आहे .तो अर्थ असा की आदल्या दिवशी केलेल्या स्वयंपाकातुन ज्या भाकरी उरतात त्या शिळ्या भाकरी सकाळच्या प्रहरी धुऊन त्यांचे तुकडे करून तेल मीठ तिखट लावून तव्यावर परतल्या नंतर त्यांचं घडणारे जे रूपांतर त्याला रयत शिक्षण संस्थे मध्ये पेढे असं म्हणतात . व हे गरिबांचे पेढे आहेत व आता हे पेढे देणे तुला अवघड आहे का .
गरिबांची अस्मिता फुलवण्याची शक्ती ज्यांच्या अंगी असते ती माणस् कुठल्या पद्धतीने संस्कार करतात हे बघण्यासारखं .एखादं म्हणाला असता पेढे खूप महाग आहेत इतकी खाती तोंड आहेत एवढे पेढे लागतील . परात भर पेढे प्राचार्य भोसले यांनी दुसऱ्या दिवशी वाटले . म्हणजे आपला आंनद उत्सव स्वाभिमान पूर्वक साजरा करण्याची शिकवण गरिबांच्या ठायी प्रगट व्हावि या साठी हि माणसं स्वतःची परिभाषा निर्माण करत असे . आणि मला अभिमान वाटतो कि माझं शिक्षण याच संस्थेत झाल.
.
कर्मवीर अण्णांच्या जयंती निम्मित त्यांचीच एक आठवण आपल्या बरच काही शिकवून जाते.
- अक्षय चंद्रकांत भोसले ०८४५१८२२७७२