Friday 13 January 2017

देव तिळीं आला - मकरसंक्रात विशेष

देव तिळीं आला । गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेलें । एका स्नानेंचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥

देव आमच्या तिळात (स्नेहात) आला म्हणजे देव आमच्या प्रेमात समरस झाला.
भगवंताच्या गोडीने जीव गोड होऊन तृप्त झाला, त्यामुळे प्राप्त झालेला पर्वकाळ
(आयुष्य)सफल झाला व आत-बाहेरचा मळ निघून गेला.

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

varkariyuva.blogspot.in