Sunday, 4 June 2017

संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा दिनक्रम ...!

संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा  दिनक्रम ...!

कसॊटी - प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

अनेक संकटातून,प्रतिकूल परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर माणूस परिपक्व होतो.
सर्व मोठ्या महात्म्यांची चरित्रे पाहिली तर याची अनेक उदाहरणे पाहावयाला मिऴतील.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप वगैरे योद्ध्यांची किंवा संतांची चरित्रे पाहिल्यास अत्यंत हालअपेष्टातून त्यांना जावे लागले असे दिसते.पण त्यामुऴेच त्यांची चरित्रे घडली.श्रीतुकोबाराय म्हणतात,

तुका म्हणे तोचि संत ।
सॊसी जगाचे आघात ।।

सुभाषितकाराने ते आघात कोणते, हे दृष्टांताने सांगीतले आहे.

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते,
निघर्षणच्छेदनतापताडनै: ।

तथा चतुर्भि: पुरूष: परीक्ष्यते: श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ।।

एखाद्याला सोन्याच्या शुद्धतेबाबत संशय निर्माण झाला तर तो सोनाराकडे जातो.सोनार कसोटीवर घासतो.सोन्याची कसोटी चार प्रकाराने होते.त्या कसोटीतून सोन्याचे गुण तपासले जातात.कसोटीवर घासून त्याची चकाकी तपासली जाते,त्याला तोडून त्याचा चिवटपणा पाहिला जातो,त्याला तापवून त्याचा रंग बदलतो,त्याला हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा, ते ताणले जाते की नाही हे पाहिले जाते.नंतर सोन्याला किंमत येते.सोनेसुद्धा कसोटीला लावले जाते,तेव्हांच त्याला सोने म्हटले जाते.त्याप्रमाणेच माणसालाही मोठे व्हायचे असेल तर त्यालाही कसोटी लावावी लागते.त्याच्या ठिकाणचे ज्ञान,त्याचे शील,गुण आणि त्याचे आचार यावरून माणसाचे मोठेपणं ठरत असते.यांपैकी एकही गुण नसेल तर त्याचे मोठेपणं कुचकामी ठरते.
छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिल्यास हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी प्रसंगपरत्वे पाहायला मिऴतात,म्हणूनच तर ते जगासमोर आदर्श ठरले.

।।राम कृष्ण हरी ।।

संदर्भ - संतसंग

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

सौ.प्रतिभाताई पाटील (मा.राष्ट्रपती - भारत ) आज श्रीमाऊलींच्या दर्शनास ..!

सौ.प्रतिभाताई पाटील (मा.राष्ट्रपती - भारत )  आज श्रीमाऊलींच्या दर्शनास ..!

Saturday, 20 May 2017

आदिशक्ती संत मुक्ताई ७२० अंतर्धान समाधी सोहळा - २०१७

आदिशक्ती संत मुक्ताई ७२० अंतर्धान समाधी सोहळा - २०१७

▪श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर

▪श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर

दि.२१ मे  २०१७  रोजी भगवान श्रीविठ्ठल  व संत निवृत्तीनाथमहाराज हे स्वतः या उत्सवाला येत आहेत .
संत मुक्ताई जेव्हा अंतर्धान पावल्या त्यावेळी स्वतः भगवंत व संत निवृत्तीनाथ उपस्थित होते .
म्हणून
श्रीविठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने श्रीपांडुरंगाच्या व श्रीसंत निवृत्तीनाथ संस्थान , त्र्यंबकेश्वर च्या वतीने श्री संत निवृत्तीनाथांच्या चरण पादुका  मुक्ताईनगर येथे येणार आहेत .
अत्यंत सुंदर व भव्य असा हा सोहळा आहे . आज दोन्ही पालख्यांचे स्वागत भुसावळ येथे करण्यात आले .

#अक्षयवारी

मुक्ताईनगर वृत्त प्रतिनिधी - श्रीज्ञानेश्वरजी  हरणे
अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच , मुक्ताईनगर

Varkariyuva.blogspot.in

Thursday, 18 May 2017

आपल्या स्मार्ट फोनवर पंढरीची वारी ...!

।। ज्ञानेशो भगवान विष्णू :।।

आजच्या तरुणांना आधात्म्याची गोडी फार कमी आहे. मात्र वारकरी संप्रदायाची प्रथा अशीच अविरत पुढे सुरू ठेवण्याकरता आम्ही तरुणांना पर्यंत संत साहित्य पोहचविण्याकरिता सोशल मीडियामार्फत पाऊल उचलले आहे .परमार्थात तरूणाची गरज आहे
श्रीमाऊलींनी सकल तरूण वर्गाला हाच संदेश दिला
परमार्थ तरून वयातच होतो .श्रीतुकोबारायांना हेच अपेक्षित आहे .
तरणा भाग्यवंत । नटे हरि किर्तनात ।।
मागील ३ वर्षांपासून अपणास थेट आपल्या व्हाट्सअप्प वर वारीचे व वारकरी संप्रदायक अभंग निरूपण आदी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत . आपण सारे भाविक मग त्यात कोणी विद्यार्थी , शिक्षक , डॉक्टर , कोपरेट्स ऑफिस , गृहिणी , वृद्ध अबाल  आदी सर्वांना वारीला येण्याची तीव्र इच्छा असते मात्र कामाअभावी तथा इतर काही तांत्रिक अडचणी मुळे येणे शक्य होत नाही याचाच विचार लक्षात घेत . प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर व प.पू. श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप यांचे अभंग निरूपण व वारी तसेच वारकरी विश्वातील सर्वच अपडेट आपणास आता घरबसल्या स्मार्टफोन वर उपलब्ध होणार आहेत .

हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी ।वारी चुको नेदी हरी।।
संत संग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ ।।
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेचि दान ।।

*विशेष सहकार्य*  -

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर , त्र्यंबकेश्वर

संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान , आळंदी  व श्रद्धेय श्रीबाळासाहेबचोपदार / श्रद्धेय  श्रीराजाभाऊ चोपदार

संत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर

अपडेट मिळवण्यासाठी -

८४५१८२२७७२  या क्रमांकावर '' वारी '' हा संदेश पाठवावा व या उपक्रमात सामील व्हावे .व इतरांना ही अवश्य ही माहिती द्या .

आपल्या सेवेत सदैव तत्पर  -
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

varkariyuva.blogspot.in