Friday 17 January 2014

जीवाला विषयाचीच गोडी वाटते .....


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
जीवाला विषयाचीच गोडी वाटते ..

हे पहा पाहुणे,या ठिकाणी जर आता विंचू निघाला,त्‍याला म्‍हटले नांगी सरळ कर तो करेल का । जाऊ द्या,आपल्‍या मुख्‍यमंत्रयाने जरी नांगी सरळ करायला सांगितली तरी तो करणार नाही. विंचू ज्‍याला चावला त्‍याला गुदगुदल्‍या होतात का. ज्‍याला चावला त्‍यालाच माहिती. आहा हा हा किती विषारी. विंचवाने भांडयाला जर डंक मारला तर बोळ पडते. एवढा विषारी आहे. तला कोणीही सांगितले नांगी सरळ कर तर तो करणार नाही. पण देवाने येथे एक एकाहून बळी निर्माण केले, तोच विंचू पाल पाहिली की लगेच नांगी सरळ करतो.कारण ती पाल त्‍याला अख्‍खा गटट करते. मग पालीलाही अभिमान झाला. एक पट विंचवाच विष पचायला दोन पट पाल. परंतु तीलाही अभिमान झाला,तर देवाने तिसरा प्राणी तयार केला कोंबडूबाई. ती कोंबूडबाई त्‍या पालीला आख्‍खी खाते. तीन पट पालीचं विष पचवायला सहा पट कोंबडीमध्‍ये विष आहे. ती कोंबडी दिवसभर उकरते परंतू पोट काय भरत नाही, हे लहान लहान मुले रस्‍त्‍याच्‍या कडेला बसतात. पहि त्‍याच्‍यावर ताव मारते आणि अशी विषारी असणारी कोंबडी पचवायला किती पट विष पाहिजे. आणि त्‍या कोंबडीलाही अभिमान झाला तर देवाने पहा ना ती कोंबडी कोण खातं. या देशातले सुशीक्षित विचारंत अशी विषारी कोंबडी खातात. सांगा पाव्‍हणे किती विषारी असतील व म्‍हणून तर या ठिकाणी मेळ बसत नाही.

सिध्‍दांत - काय खावं आणि काय खाऊ नये. काय प्‍यावं आणि काय पिऊ नये हे सुध्‍दा आम्‍हाला कळत नाही. इतके आम्‍ही विषयाधीन झालो. म्‍हणून तर देवाचा संबंध आम्‍हाला कळत नाही. मनुष्‍य म्‍हणून जन्‍माला येऊन सुध्‍दा आम्‍ही माणसासारखे वागत नाही.

प्रमाण - १) विषय ओढी भुलले जीव । कोण करीत त्‍यांची कीव । न उपजे नारायणी भाव । पावोनी ठाव नरदेह ॥ तुकाराम महाराज ॥
२) वेदे न करीता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्‍वभावे सकळ जना । अनिवार्य ॥ भागवत॥

तुमचा 
अक्षय भोसले ,
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य