Wednesday 15 January 2014

संत विचाराचा प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या रामेश्वर शास्त्रींचा निषेध !

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य 
संत विचाराचा प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या रामेश्वर शास्त्रींचा निषेध ! 
.
वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास विरोध करणाऱ्या स्वयंघोषित धर्माचार्य रामेश्वर शास्त्रींचा वारकरी युवा मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. वारकरी युवा मंचला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या सन्मानामुळे पोटशूळ उठलेल्या रामेश्वर शास्त्री यांनी नुकतीच एका व्यासपीठावर बेताल बडबड करून आपल्या नीच वृत्तीचे दर्शन घडविले.
त्याबद्दल वारकरी संप्रयातील विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


वारकरी संतांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारकरी युवा मंचच्या वतीने प्रचार आणि प्रसार केला जातो.

ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखोबा, गोरोबा यांनी सातशे वर्षापूर्वी, एकनाथ महाराजांनी साडेसहाशे वर्षापूर्वी तर तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जे सामाजिक समतेचे आणि डोळस भक्तीचे विचार जगाला दिले त्याची उपयुक्तता आजही कशी आहे, हे वारकरी युवा मंचने सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून जगास दाखवून दिले.

युवा मंचने केलेल्या या कामगिरीची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आणि १४ जानेवारी रोजी होत असलेल्या ‘ऑक्टेव्ह फेस्टीवल’मध्ये सादरीकरणासाठी निमंत्रीत केले.
वारकरी युवा मंचला मिळालेल्या सन्मानाचा प्रत्येक वारकऱ्याला अभिमान वाटत आहे. मात्र इतरांना मिळालेल्या सन्मानाने रामेश्वर शास्त्रीला नेहमीच पोटशूळ उठतो. तसाच तो पुन्हा पोटशूळ उठला.

वारकरी संप्रदायात इतरांचे कौतूक झाले,
इतराने काही चांगले केले की या शास्त्रीने नेहमी खोडा घातलेला आहे.
नुकताच वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने पांडुरंगाचा पालखी सोहळा मुंबईत निघाला. तेव्हा वारकरी प्रबोधन समितीच्या सर्व विश्वस्तांनी वारकरी युवा मंचला मिळालेल्या सन्मानाचे तोंडभरून कौतूक केले.
वारकरी प्रबोधन समितीचे विश्वस्त शामसुंदर महाराज सोन्नर यांनी तर जाहीररीत्या या सन्मानेचे कौतूक करून युवा मंचच्या उपक्रमात वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
मात्र यावेळी व्यासपीठावर असलेल्या रामेश्वर शास्त्री यांचा तोल गेला आणि त्यांनी असंबंध बडबड केली. आंतरराष्ट्रीय मिळालेल्या सन्मानात काही विशेष नाही,
अशा सन्मानाची गरज नाही.
अशाप्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास संप्रदायाची किंमत कमी होईल असे अकलेचे तारे त्यांनी तोडले..
विद्यापीठात शिक्षण घेऊन कोणी मोठा होत नाही,
अशी बेताल बडबड केली.
खंत इतकीच वाटे कि "एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ " हे कृपया कोणी त्यांना सांगाव .
अशा अक्कलशून्य व बेताल बडबड्या, शास्त्री?? व्यक्तिचा
वारकरी युवा मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे..
(यातील एक हि शब्द कोणाच्या मनाचा नाही त्यांच्या भाषणाचा विडओ हि युवा मंच कडे उपलब्ध आहे )
वरील गोष्टी विषयी कुणास आक्षेप असेल तर त्वरित संपर्क करा :- वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य - ९८९२१६६४७०/८४५१८२२७७२