Tuesday 29 April 2014

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
‘‘उत्तम समाज घडविण्यासाठी माणसाला ज्ञानाची गरज असते आणि शिक्षणातूनच मानवाला उदंड ज्ञान मिळते. विद्येने मनुष्य समृद्ध होतो. त्यासाठी शिक्षण घेतलेच पाहिजे,’’ असे मौलिक उद्गार थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले.
 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित करण्यात आले .आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जे समाज प्रबोधनाचे कार्य केले, रंजल्या -गांजलेल्यांना त्यांनी जगायला शिकवले. जगातील करोडो कुटुंबाना त्यांनी सत्कार्याचा मार्ग दाखवला. तसेच ते हे कार्य विनामुल्य आणि कोणत्याही प्रसिद्धीसाठी करीत नाही. म्हणूनच त्यांच्या या महान कार्याची दाखल घेऊन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून ‘डी लिट’ ही पदवी बहाल करण्यात आली . महाराष्ट्रातील संपूर्ण अध्यात्मिक क्षेत्राकरिता एक आनंदाची बाब आहे . अनेकानेक प्रणाम आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारीजी यांना दीर्घआरोग्य लाभो व पुढे हि समजाची अशीच सेवा घडत राहो हि माउलींचरणी प्रार्थना !
समस्त वारकरी संप्रदाय यांच्यावतीने खूप खूप शुभेच्छा !