Tuesday 29 April 2014

अध्याय प्रथम ओवी क्रमांक ७५ ते ७७ निरुपण

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा न किती सुंदर ओवी आहे अगदी अगदी या ओवी माउलींच्या ओवी प्रमाणे माउलींनी माझ्यावर कृपा केली आहे . ज्ञानेश्वरी प्रथम अध्याय ओवी क्रमांक ७५ , ७६ आणि ७७ 

परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ 
येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ 
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे । की मृतही जीवित लाहे ।
माऊली म्हणतात मला श्रीगुरू अनुकूल आहेत त्यांचाच मला आधार आहे आणि त्यांच्या मुलेच मला काव्य ज्ञानेश्वरी लिह्ण्याकरिता धीर आला अन्यथा अर्थात एरवी मी खरोखर मुर्क , अज्ञानी असून अविचारच करीत आहे तथापि तुम्हा संताचा कृपारूपी दीप मार्गदर्शक आहे , हे मी माझे भाग्य समझतो . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले कि तो जिवंत होतो अगदी तशीच कृपा माउलींची माझ्यावर आहे . आम्ही जे काही चांगल कार्य करतो यामागे गुरुवर्य महंत प्रमोद महाराज जगताप याचं मार्गदर्शन तथा आधार असतो . योगियांची माऊली ज्ञानियांचे राजे असे ज्ञानेश्वर महाराज मात्र पहा स्वत : मूर्ख अज्ञानी म्हणवून घेतात . किती मोठेपण आहे माउलींची हाच गुण सर्वांनी अंगिकारला तर समजतील प्रत्येक व्यक्ती उच्चस्थ पदावर विराजमान होईल " नम्र झाले भूत तेणे कोंडिले अनंता " किवा "तुका म्हणे भोळा जिंकू काळी काळा " संतांची कृपा गुरुकृपा हेच माझे दीप मार्गदर्शक आहे अस माऊली प्रतीपादित करतात व संत भेट हे माझ परमभाग्य असे समजतात . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोन होत किंवा मेलेल्या माणसाला अम्रूर पाजले कि तो जिवंत होतो तसच अगदी गुरु कृपेने संत भेटणे हेच सुख प्राप्त होते .
संतचरणदास अक्षय भोसले - ८४५१८२२७७२