Thursday 29 May 2014

“मेळविली मांदी वैष्णवांची ”- अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा ना जस कि आपण म्हणतो कि वारी जवळ आली आता तयारीला लागल पाहिजे अगदी असच जेव्हा माउलींनी वारी सुरु केली तेव्हाचा प्रसंग आपणापुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न !
संताचिये पायी हा माझा विश्वास | सर्व भावे दास झालो त्यांचा || गुरुवर्यांना दंडवत 

माझ्या माऊलीने अर्थात ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षाच्या आत रेडा बोलवणे , मेलेले पितर जेवण्यास बोलवणे , मशीद बोलविणे , सच्चिदानंदयांस जिवंत करणे , ज्ञानेश्वरी अमृतानुभव व इतर ग्रंथ लिहिणे , भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजून दाखवणे वैगरे सर्व कृत्य केली म्हणजे ये मराठीचिये नगरी | ब्रह्मविद्येचा सुकाळ करी | घेणे देणे सुखचि वरी || व मिरविला बडिवार सिद्धाईचा || हि सर्व कामे पूर्ण झाली . आता उरलेल्या आयुष्यात भक्ती व वारकरी पंथाचा प्रचार करणे हे काम राहिले होते . त्याकरिता काय काय केले पाहिजे , याची आखणी करून , दिंडीची रचना केली , त्याकरिता टाळ , घोळ , चिपळ्या , विना , मृदुंग , भेरी , तुतारी , कुंचा म्हणजे चवरी , गरुड , ध्वज , पताका ,दंड , देवाचा छडीदार चोपदार , एवढी सामुग्री तयार करून दिंडीची रचना केली व त्याकरिता “मेळविली मांदी वैष्णवांची ”
भक्त समुदाय मिळवला व शके १२१३ ला आषाढी वारीस पहिली दिंडी काढली .कारण १२१२ मध्ये नेवाश्यला होते त्याच्या अगोदर पैठणात होते . म्हणून पहिली वारी शके १२१३ च मानली पाहिजे असो याप्रमाणे दिंडीची रचना करून पंढरीस निघाले त्याचे वर्णन एका अभंगात ज्ञानोबा माऊली करतात ते अस कि ,
उंच पताका झळकती | टाळ मृदुंग वाजती |
आनंदे प्रेमे गर्जती | भद्रजाती विठ्ठलांचे ||१||
आले हरीचे विनट | वीर विठ्ठलाचे सुभट |
भेणे दिप्पट | पळती थाट दोषांचे ||२||
तुलसीमाळा कंठी | गोपीचंदनाच्या उटी |
सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी | बारा वाटा पळताती ||3||
सतत कृष्णमुर्ती सावळी | खेळे हृद्यकमळी |
शांती क्षमा तयाजवळी | जीवेभावे अनुसरल्या ||४||
सशत्र नामचे हातीयेर | शंख चक्राचे शृंगार |
अति बळ वैराग्याचे थोर | केला मार षडवर्गा ||५||
ऐसे एकांग वीर | विठठल रायाचे डिंगर |
बापरखुमा देवीवर | तीही निर्धार जोडीला ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२६
निवृत्ती संत हा सोपान | महावैष्णव कठीण |
मुक्ताबाई तेथे आपण | नारायण जपतसे ||५||
ज्ञानदेव वैष्णव मोठा | विठ्ठ्ल नामे मुक्तपेठा |
स्नान दान घडे श्रेष्ठा | वैकुंठा वाटा संत गेले ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२७
आषाढी पर्वणी आला यात्रा काल | निघाले सकळ वारकरी ||
या प्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा काढून वाटेने भजन करीत पंढरीस निघाले .
जस माउलींनी तेव्हा तयारी केली तसीच अगदी आता सर्व संस्थान महाराज मंडळी सर्व भक्त जन तयारी करू लागले वैष्णवंची मांदी मिळवू लागलेत . पहा जरा आठवून तो प्रसंग डोळ्यापुढे केवळ आनंद आणि आनंदच
जास्तीत जास्त युवा वर्गापर्यंत देशा विदेशात वारकरी संप्रदाय अग्रगण्य असावा जसा कायमच राहत आला आहे या करीतच हा छोटा प्रयत्न .युवकानो जास्तीत जास्त संत साहित्य वाचा . विज्ञान युगातील शिक्षणाला अध्यात्माची जोड द्या आणि पहा आनंद काही निराळाच
आपण वेळ काढून इतक सर्व वाचल आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच .
इतरांपर्यंत हि माहिती पोहचवता आली तर नक्कीच प्रयत्नशील रहा हि विनंती !
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !