Wednesday 16 July 2014

पृथ्वी चे सूर्याभोवती परिभ्रमण - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान  विष्णू ||.
संत साहित्य आणि विज्ञान याची सांगड फार पूर्वीपासून चालत आली आहे , दुर्दैवाची गोष्ट आपण आपल्या परंपरे कडे विचारपूर्वक पाहतही नाही . लक्षात घ्या आपणच जर आपल्यापरंपरेचा अभ्यास केला नाही तर कोण करणार ? असो .

आम्हाला चवथ्या अध्याय वाचताना , श्री ज्ञानेश्वरीतील या वैज्ञानिक सिद्धांतांचे दर्शन ज्या ओविमुळे घडते ती ओवी , 
आणि उदो-अस्ताचेनि प्रमाणे। जैसे सूर्याचे न चलता चालणे। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे। कर्मेचि असता॥ 
- श्री  ज्ञानेश्वरी ४-९९ 
कर्म करूनही , केलेले दिसूनही 'नैष्कर्म्य' कसे असू शकते हा विषय समजाऊन सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात , ज्याप्रमाणे आपल्याला उदय-अस्त असा सूर्याचा प्रवास , चालणे दिसते . परंतु प्रत्यक्षात सूर्य काही उगवतीकडून (पूर्वेकडून ) मावळतीकडे ( पश्चिमेकडे ) चालत नाही , त्याप्रमाणे कर्म करीत असतानाही नैष्कर्म्य अवस्था असू शकते हे जाणतो ..
 या ओवीमध्ये सूर्य उदय ते अस्त या प्रवासात सूर्य पूर्व क्षितिजाकडून पश्चिम क्षितिजाकडे फिरलेला प्रत्यक्ष दिसतो , असे दिसत असूनही प्रत्यक्षात सुर्याचे चालणे न चालता झालेले असते , असे स्पष्ट सांगितले आहे . ' न चालता सूर्याचे चालणे ' म्हणजेच सूर्य असा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत नाही . तो त्याच्या ठिकाणीच असतो . पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या परिभ्रमणामुळे आपल्याला तसे वाटते . या शास्त्रीय सत्याचाच उलेख्ख या उपमेमधे केलेला आहे .
 म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणामुळे उदय -अस्त असे सूर्य फिरल्यासारखे वाटते . मग पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते आहे याचे ज्ञान आपल्याकडे पूर्वी होते काय , याचे अन्य प्राचीन संदर्भ आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होतो 
आणि याचे उत्तर आहे , याचे प्राचीन संदर्भही आहेत !
 आपल्याकडे अनेक पुराने ( १८ महत्त्वाची पुराणे ) उपलब्ध आहेत . त्यांचा सामन्यत : काल ५००० वर्षापूर्वीचा आहे . दुर्दैवाने त्यांच्याकडेही आपण केवळ एक "रंजक कथा" म्हणून पाहतो . त्यांच्यामधेही  असे वैज्ञानिक संदर्भ आढळतात . जिज्ञासूसाठी प्रस्तुत प्रकरणाच्या विषयाचे दोन संदर्भ देतो त्यावरून आपल्या लक्षात येईल . सुप्रसिद्ध अशा श्रीमद भागवत महापुराणामधे कर्दम प्रजापतीने आपली पत्नी देवहुती हिला तत्कालीन विमानातून भूगोल दाखविला असा स्पष्ट निर्देश आहे  
 "प्रेक्षयित्वा भुवो गोलं " पत्‍न्यै यावान् स्वसंस्थया । बह्वाश्चर्यं महायोगी स्वाश्रमाय न्यवर्तत ॥ 
                             ( - श्रीभागवत ३-२३-४३ )

देवीभागवतामधेही स्पष्ट उलेख्ख आहे कि ,
 नैवास्तमनमर्कस्य नोदयः सवकदा सतः ॥
 उदयास्तमनाख्यंहि. दर्कनादर्कनं रवः ॥ (- देवीभागवत .८-१५-२४ )
सूर्य सर्वदा आहे तसाच सत्य आहे  , त्याला अस्त नाही , उदयही नाही .
सूर्य दिसायला लागला कि उगवला म्हटले जाते . दिसेनासा झाला कि मावळला असे म्हटले जाते अस अजून बरच गूढ आपल्या संत साहित्यात आह इमात्र आपण ते चीक्तसक रित्या अभ्यासल पाहिजे ,

संदर्भ: 

१. आर्यभटीय- गोलपाद 
२. आकाशाशी जडले नाते. डा. जयंत नारळीकर. (पृष्ठ २ व ३९)
३. "Birth and Early Development of Indian Astronomy - Dr. Subhash Kak
४.  Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? - Roopa H. Narayan
५. A Note on Aryabhata's Principle of Relativity- Abhishek Parekh
६ . भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय- डा. मोहन आपटे

                           संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ,     लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद 
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र