Monday 18 July 2016

वै.पूज्य श्रीगुरु मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण !

।। दर्शने प्रशस्तीसी ठावो ।।
पुण्यातील एस पी काॅलेजमध्ये मुलांना शिकवण्यासाठी वर्गात आलेले  शिक्षक धोतर. बंड़ी व ड़ोक्यावर टोपी परिधान केलेले बघुन वर्गातील मुलांनी उपहासाने आपल्या शिक्षकांना बघून
पुड़ंलिक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पढंरीनाथ भगवान कि जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय
जगदगुरू तुकाराम महाराज कि जय
असा जय घोष करावा

त्या शिक्षकांनेही आपल्या विद्यार्थ्यांना  पुन्हा आदराने सांगावे
बघा विद्यार्थ्यांनो
ह्या वारकरी वेशाची किती महानता आहे
मला या वारकरी वेशात बघुन जर तुम्हाला भगवान पढंरीश परमात्माच स्मरण होत असेल
तर हि या सप्रंदायाच्या वेशाची महती आहे
हे आपल्या शिक्षकाचे उत्तर ऐकुन सर्व वर्गच पुन्हा मौन झाला
ते फर्ग्युसन काॅलेजातील शिक्षक होते वै . शं वा . उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दाड़ेकंर
शके१८१८
वैशाख शुद्ध ७ सोमवार २० -४ -१८९६ रोजी ठाणे जिल्ह्यातील माहिम येथील जन्म
घरातिल बालवयातच झालेले बालमनावर उत्तम संस्कार
अंगचीच श्रेष्ठ बुद्धीमत्ता

बालवयातच गुरूवर्य जोग महाराजांची झालेली कृपा
सदगुरू मुखातुन कोवळ्या वयातच ग्रंथराज ज्ञानेश्वरीच श्रवण
शिस्तीचे अतिशय भोक्ते . वक्तशीर स्वभाव असुनही स्वभावातील गोड़वा अवर्णनीयच
चारीत्र सपंन्न . कर्तव्यदक्ष व निष्णांत शिक्षक म्हणून ख्याती असलेले मामासाहेब नैष्टिक ब्रम्हंचारी होते
शिकवण्याच्या मानधनातुन मिळालेल स्वनिर्वाहा पुरतेच ठेवुन उर्वरीत गरजु विद्यार्थ्यांना मदतीसाठी वापरत
इतका मनमिळाऊ स्वभाव
समोरच्याला क्षणात आपलंस करणारा व्यक्तीमत्व
परंतू
कुर्वन्नपि न लिप्यते
या त्यांच्याच अति आवड़त्या वाक्याप्रमानेच ते कशाला चिकटलेच नाही
मामा खरे तर होते संसारात
पन ते तर साध्या वेशातील उत्तम संन्यासी जीवन जगत होते
अधिकार तैसा करू उपदेश
हि तर मामासाहेबांची ख्यातीच
जो कोणी प्रश्न विचारला येईल
त्याच्या योग्यतेनुसार उत्तर देऊन समाधान करत
वारकरी वेशाबद्धल मामासाहेब म्हणत
बाबांनो
हा पांढरा वेश परिधान करताय
हे खूप छान आहे
पण
या पांढर्या कपड़्यात वावरताना खुप जपाव लागत
या पांढर्या कपड़्याला छोटासा सुद्धा ड़ाग सहन होत नाही
तो दुसर्याला अगदी सहजच दिसुन येतो
कोणी प्रश्न विचारला
मामा
मि ब्रम्हंचारी राहू का ?
तर ते अगदी सहजच म्हणत
लग्न करणेच बरे !
कारण
जो ब्रम्हंचारी राहू ईच्छितो
तो दुसर्याला विचारत फिरत नाही
असे मितभाषी व्यक्तिमत्व
अमानीत्व . निरपेक्षीत्व व अनासक्ति हे गुण अंगी असल्याने
त्याच्यां केवळ दर्शनानेच पाहणार्यानां समाधान होत
व प्रसन्न वाटे
आज आषाढ शुद्ध चतुर्दशी
सोनोपंत उर्फ मामासाहेब दाड़ेकंर
या महात्माचा पुण्यस्मरण दिन
श्री संताचिये माथा चरणावरी ।
साष्टांग हे करी दंड़वत ।।