Thursday 14 July 2016

श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात माऊलींच्या पादुका दिल्या तो क्षण !

आज श्री माऊलींचा पालखी सोहळ्याने वैष्णवांची नगर पंढरी नगरी मध्ये प्रवेश केला , त्यावेळी श्री माऊलींच्या पादुका श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये देण्याची परंपरा आहे तेव्हाचे काही क्षण 

वंशपरंपरा दास मी अंकीत.......

आज माऊलींच्या सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण पार पडले व परंपरेप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांचे पालखी सोहळा मालक प. पु. हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब पवार ( आरफळकर ) यांनी श्री माऊलींच्या पादुका रथातून काढुन उर्जितसिंह शितोळे सरदार यांच्या गळ्यात दिल्या. पादुकांचा दुसरा जोड पालखीत ठेवण्यात आल्या .
माऊलींचे वंशपरंपरागत श्री चोपदार व वासकर परीवार शितोळे सरदारांच्या बाजुने चालत होते.
हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दिंड्यामधुन वाट काढत श्री शितोळे सरदारांनी माऊलींच्या पादुका नाथचौकातील श्री ज्ञानेश्वर मंदीरामध्ये आणल्या . मंदीरात समाज आरती झाली....
आणि नकळत ओठावर अभंग आला.......
पावलो पंढरी वैकुंठ भुवन |
धन्य आज दिन सोनियाचा ||