Friday, 9 September 2016

३५ शास्त्रीय रागांमध्ये स्वरबद्ध केलेला हरिपाठ !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।
संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमाऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णू .भावार्थदीपिका उर्फ श्रीज्ञानेश्वरी हि माऊलींची काया असून हरिपाठ हे त्यांचे ह्रदय आहे .वेदशास्त्रपुराणांचे सार म्हणजे हरी. तो हरी हरिनामानेच प्राप्त करण्याचा  सुगम उपाय हरिपाठात ज्ञानोबा माऊलींनी सर्वांसाठी प्रगट केलेलं आहे . हरिपाठ हा वारकऱ्यांच्या साधक जीवनाचे प्रमुख अंग आहे . आज पर्यंत अनेक मान्यवर गायकांनी आपल्या शैलीत हरिपाठ गायलेला आहे . त्यावर अनेक ध्वनी मुद्रणेही उपलब्ध आहेत .तथापी सुप्रसिद्ध शास्त्रीय अभंगवाणी  गायक संगीत अलंकार ह.भ.प.श्री सूर्यकांतजी गायकवाड यांनी स्वरसाध चढवलेला आणि त्यांच्या धर्मपत्नी व शिष्या सौ संगीता ताई तसेच त्यांची कन्या व शिष्या कु.गायत्री या मायलेकींनी गायलेला व कु. रमाकांत गायकवाड यांची हार्मोनियम साथ व श्री पांडुरंग पवार यांची तबला साथ लाभलेला समाधी संजीवन हरिपाठ !
हा हरिपाठ वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण कि  , या हरिपाठात प्रत्येक अभंगाला त्या अभांगतील भावार्थानुसार समर्पक रंगांची निवड करून तशी चाल लावण्यात आलेली आहे.विविध अशा सुमारे ३५ रागांमध्ये  ह्या चाली निबद्ध केलेल्या असून सप्तसुरांच्या आरोहाचा चढता क्रम ह्या चालींमध्ये सुरेख पणे योजलेला आहे. असा हा अत्यंत भक्तीयुक्त अंतःकरणाने गायलेला हरिपाठ आपल्या मनाला नक्कीच शांतता प्रदान करेल . सीडी मिळवण्याकरिता आजच संपर्क करा.

https://soundcloud.com/1u7a3cctqd5t/sant-dnyaneshvar-maharaj-haripath-varkariyuvablogspotin

श्रवणानंतर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
गायत्री गायकवाड  ९७६३४६२२३१
(Also Search On YouTube Ramakant / Gayatri Gaikwad )
- varkariyuva.blogspot.in