Friday, 9 September 2016

श्रीराधाष्टमी ।।

आज श्रीराधाष्टमी !!
अनुत्तरभट्टारिका,  व्रजनंदिनी, महारासेश्वरी, कृष्णमन्त्राधिदेवता श्रीकृष्णवल्लभा आदिशक्ती भगवती श्री श्रीराधाजींची जयंती !
बिन राधा कृष्ण आधा । असे महात्मे आवर्जून सांगतात. नुसते सांगतात नव्हे तर ती वस्तुस्थितीच आहे. शक्तीशिवाय 'शिव'ही 'शव'रूप होऊन जातात, असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजही म्हणतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची आल्हादिनी दिव्यशक्ती म्हणजे अपर-श्रीकृष्णस्वरूपा भगवती श्रीराधा !
रा शब्दोच्चारणादेव स्फीतो भवति माधव: ।
धा शब्दोच्चारणादेव धावत्यैव ससम्भ्रम: ।
एखाद्याने अत्यंत प्रेमाने " राधा " नाम घ्यायचे ठरवून त्यातले नुसते " रा " उच्चारले की, भगवान श्रीकृष्णप्रभू अत्यंत उल्हासित, आनंदित होतात आणि पुढे " धा " म्हटल्याबरोबर त्या भक्ताच्या मागे मागे धावू लागतात, इतके त्यांचे श्रीराधाजींवर प्रेम आहे.
- रोहन  उपळेकर