Saturday, 3 May 2014

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१४

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१४ 

* वेळापत्रक * 
आळंदी ते पंढरपूर 

शुक्रवार २० जून २०१४ 
पालखीचे प्रस्थान दुपारी ४ 
 वाजता
गांधीवाडा - आळंदी ( पालखीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार २१ जून २०१४
१ ) थोरल्या पादुका ( आरती )
२ ) भोसरी फाटा ( सकाळचा विसावा )
फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य )
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा )
पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार २२ जून २०१४
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ , पुणे ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

समोवार २३ जून
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा )
हडपसर ( दुपारचा नैवेद्य )
१ ) उरूळी देवाची , २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा )
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार २४ जून
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

बुधवार २५ जून २०१४
बोरवके मळा ( सकाळचा विसावा )
यमाई - शिवरी ( दुपारचा नैवेद्य )
साकुर्डे ( दुपारचा विसावा )
जेजुरी ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

गुरुवार २६ जून २०१४
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा )
वाल्हे ( दुपारचा नैवेद्य )
वाल्हे ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शुक्रवार २७ जून २०१४
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा )
नीरा ( दुपारचा नैवेद्य )
श्रींचे नीरास्नान ( दुपारचा विसावा )
लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार २८ जून २०१४
लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार २९ जून २०१४
लोणंद ( दुपारचा नैवेद्य )
चांदोबाचा लिंब - उभे रिंगण - १ ( दुपारचा विसावा )
तरडगाव ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

सोमवार ३० जून २०१४
१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा )
निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य )
वडजल ( दुपारचा विसावा )
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार १ जुलै २०१४
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )
.......................................................................................................

बुधवार २ जुलै २०१४
विडणी ( सकाळचा विसावा )
पिंपरद ( दुपारचा नैवेद्य )
निंबळक फाटा ( दुपारचा विसावा )
बरड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

गुरुवार ३ जुलै २०१४
साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा )
धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य )
शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा )
नातेपुते ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शुक्रवार ४ जुलै २०१४
मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य )
१ ) सदाशिवनगर - गोलरिंगण - १ ,
२ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा )
माळशिरस ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार ५ जुलै २०१४
खुडुस फाटा - गोल रिंगण - २ ( सकाळचा विसावा )
विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य )
धावा - बावी माऊंट ( दुपारचा विसावा )
वेळापूर ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार ६ जुलै २०१४
ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण - ३ ( सकाळचा विसावा )
तोंडले - बोंडले ( दुपारचा नैवेद्य )
टप्पा ( दुपारचा विसावा )
भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

सोमवार ७ जुलै २०१४
भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य )
बाजीरावाची विहिर - उभे रिंगण - २ , गोल रिंगण - ४ ( दुपारचा विसावा )
वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार ८ जुलै २०१४
वाखरी ( दुपारचा नैवेद्य )
पादुकेजवळ उभे रिंगण - ३ - आरती ( दुपारचा विसावा )
पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )
.......................................................................................................
भागवत एकादशी , आषाढी यात्रा पंढरपूर

अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

Thursday, 1 May 2014

अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।। 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।
संत तुकाराम महराज 
आज आपण जे कार्य करतो ते कधी हि न संपणार अर्थात अक्षय असत अस म्हणतात . आपण सर्वाना विनंती आजपासून आपण संतांच्या कोणत्या हि एक साहित्याच वाचन कराव .
आपणा सर्वाना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा !
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - अक्षय भोसले

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
गरजा महाराष्ट्र माझा ..! 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य

Tuesday, 29 April 2014

अध्याय प्रथम ओवी क्रमांक ७५ ते ७७ निरुपण

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा न किती सुंदर ओवी आहे अगदी अगदी या ओवी माउलींच्या ओवी प्रमाणे माउलींनी माझ्यावर कृपा केली आहे . ज्ञानेश्वरी प्रथम अध्याय ओवी क्रमांक ७५ , ७६ आणि ७७ 

परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ 
येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ 
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे । की मृतही जीवित लाहे ।
माऊली म्हणतात मला श्रीगुरू अनुकूल आहेत त्यांचाच मला आधार आहे आणि त्यांच्या मुलेच मला काव्य ज्ञानेश्वरी लिह्ण्याकरिता धीर आला अन्यथा अर्थात एरवी मी खरोखर मुर्क , अज्ञानी असून अविचारच करीत आहे तथापि तुम्हा संताचा कृपारूपी दीप मार्गदर्शक आहे , हे मी माझे भाग्य समझतो . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले कि तो जिवंत होतो अगदी तशीच कृपा माउलींची माझ्यावर आहे . आम्ही जे काही चांगल कार्य करतो यामागे गुरुवर्य महंत प्रमोद महाराज जगताप याचं मार्गदर्शन तथा आधार असतो . योगियांची माऊली ज्ञानियांचे राजे असे ज्ञानेश्वर महाराज मात्र पहा स्वत : मूर्ख अज्ञानी म्हणवून घेतात . किती मोठेपण आहे माउलींची हाच गुण सर्वांनी अंगिकारला तर समजतील प्रत्येक व्यक्ती उच्चस्थ पदावर विराजमान होईल " नम्र झाले भूत तेणे कोंडिले अनंता " किवा "तुका म्हणे भोळा जिंकू काळी काळा " संतांची कृपा गुरुकृपा हेच माझे दीप मार्गदर्शक आहे अस माऊली प्रतीपादित करतात व संत भेट हे माझ परमभाग्य असे समजतात . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोन होत किंवा मेलेल्या माणसाला अम्रूर पाजले कि तो जिवंत होतो तसच अगदी गुरु कृपेने संत भेटणे हेच सुख प्राप्त होते .
संतचरणदास अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
‘‘उत्तम समाज घडविण्यासाठी माणसाला ज्ञानाची गरज असते आणि शिक्षणातूनच मानवाला उदंड ज्ञान मिळते. विद्येने मनुष्य समृद्ध होतो. त्यासाठी शिक्षण घेतलेच पाहिजे,’’ असे मौलिक उद्गार थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले.
 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित करण्यात आले .आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जे समाज प्रबोधनाचे कार्य केले, रंजल्या -गांजलेल्यांना त्यांनी जगायला शिकवले. जगातील करोडो कुटुंबाना त्यांनी सत्कार्याचा मार्ग दाखवला. तसेच ते हे कार्य विनामुल्य आणि कोणत्याही प्रसिद्धीसाठी करीत नाही. म्हणूनच त्यांच्या या महान कार्याची दाखल घेऊन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून ‘डी लिट’ ही पदवी बहाल करण्यात आली . महाराष्ट्रातील संपूर्ण अध्यात्मिक क्षेत्राकरिता एक आनंदाची बाब आहे . अनेकानेक प्रणाम आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारीजी यांना दीर्घआरोग्य लाभो व पुढे हि समजाची अशीच सेवा घडत राहो हि माउलींचरणी प्रार्थना !
समस्त वारकरी संप्रदाय यांच्यावतीने खूप खूप शुभेच्छा !