Friday 18 July 2014

ज्ञानेश्वरीतील भौगोलिक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||.

भौगोलिक संदर्भ 


अठराव्या आध्यायात , माणसाच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करणाऱ्या वायुत्त्वाच्या स्वरूपाविषयी म्हटले आहे , 

आणि पूर्वपश्चिमवाहणी | निघलिया वोघाचिया मिळणी |
होय नदी नद पाणी | एकचि जेवी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३१

ज्याप्रमाणे पूर्वेला वाहणारी नदी असो किंवा पश्चिमेला वाहणारी नदी असो , लहान नदी असो वा मोठा नद असो त्याचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते ,
(त्याप्रमाणे निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे एकच प्राणशक्ती कार्यरत असते. )
आपल्या देशातल्या चार प्रमुख महानद्यांच विचार केला तर त्यापैकी गंगा , गोदावरी आणि कावेरी या पूर्व समुद्राला , गंगासागराला ज्याला बंगालचा उपसागर असे म्हटले जाते त्याला आणि नर्मदा हि पश्चिम समुद्राला सिंधू सागराला ज्याला अरबी समुद्र म्हटले जाते त्याला मिळतात .
भारता भोवती असलेले हे तीनही समुद्र वास्तविक एकच आहेत . पृथ्वीसाठी ' भूगोल ' हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे .
उदा .
' .....भूगोलु हा || '
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-७०
किंवा

' तरि भूगोलुचि काखे सुवावा ..'
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-२६०

निगिजे पुर्विलिया मोहरा | की येईजे पश्चिमेचिया घरा |
निश्चळपणे धनुर्धरा | चालणे एथिंचे ||
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ६-१५९
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र