Friday 18 July 2014

श्री ज्ञानेश्वरीतील आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीत आलेल आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ आपल्यापुढे मांडण्याचा आमचा छोटा प्रयत्न ! 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आदर्श औषध कोणते याचा उल्लेख केलेला आहे .
जैसे रसौषध खरे | आपुले काज करूनि पुरे |
आपणही नुरे | तैसे होतसे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१०७९
ज्या प्रमाणे खरे औषध आपले रोग्निवारणाचे अपेक्षित कार्य पूर्ण करून स्वत : ही संपून जाते , त्याचा कोणताही अन्य परिणाम ( side effect ) होत नाही . ( त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर साधनाची आवशक्यता संपते )
जीव भावासाठी पंचमहाभूतांचे केवळ पंचीकरण होऊन पुरत नाही तर पचीकरण होऊन पुरत नाही तर पंचीकरणा बरोबर ज्यावेळेस अहंकाराची उपलब्धी होते , त्यावेळेस पंचमहाभूते जीवभावास प्राप्त होतात . हे सांगताना म्हटले आहे ,
जैसा ज्वरु धातुगतु | अपथ्याचे मिष पहातु |
मग जालिया आतु | बाहेरी व्यापी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-८०
जंतुसंसर्ग झाल्यावर लगेचच काही रोग होत नाही तर काही अपथ्य झाल्याच्या निमित्ताने शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यावर रोग होतो .
आपण स्वीकारलेल्या अन्नाप्रमाणे शरीर आणि मन- बुद्धी बनत जाते . यासाठी अन्नशुद्धीही महत्त्वाची असते .
तेवी जैसा घेप आहारु | धातु तैसाचि होय आकारू |
आणि धातु ऐसा अंतरु | भावो पोखे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-११६
सेवन केलेल्या अन्नाच्या गुणांप्रमाणे शरीराला बल प्राप्त होते आणि अंत : करणही त्यानुसार बनत जाते ..
                 संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                  आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र