Sunday 19 June 2016

योग:चित्तवृत्ती निरोध: - पतंजली सूत्र (१.०२ )

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

आज जागतिक योग दिन - २१ जून  या अनुषंगाने काहीस चिंतन !

श्री ज्ञानेश्वरी ६ व्या अध्यायामध्ये योगाचा विस्तार माऊली सांगतात . आणि ६ वा अध्याय म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायचे झाले तर ,

 तैसें गीतार्थाचे सार । जे विवेकसिंधूचे पार । 

नाना योगविभवभांडार ।  उघडेल का ।। ओवी क्र ११ / ६ वा अध्याय 

याचा अर्थ असा की , ६ वा अध्याय हा म्हणजे गीतार्थचं सार आहे . आत्मनात्म विचारांचा पैलतीर आहे आणि योगसंपत्तीचा खजिनाच आहे .

पहिले  पाच अध्याय भगवान श्री कृष्णाने कर्मयोग सांगितला .मग त्यानंतर आता योग का सांगतो आहे ? या दोन्हीचा संबंध काय आहे ? कर्माचा आणि योगाचा संबध काय आहे हे आपण समजून घ्या. हे आपण संक्षेपाने पाहू . कर्माला चार अंग आहेत .पहिलं असेल तर कर्म करणं दुसर असेल तर कर्म सोडणं , तिसरं कर्म सुटणं आणि चौथ असेल तर त्याला चमत्कारच म्हणावं लागतो, कर्म करण आणि न केल्या सारख राहणं. पहिलं आहे कर्म करण हे तुमच्या हातात आहे का?  माऊली अस म्हणतात कि , कर्म प्रकृतीगुणे , पराधीनपणे निर्माण होत. अमकं कर्म मी अमक्या वेळेला करीन हे तुमच्या हातात नाही . तुम्ही रेल्वेने जाता,बसने जाता त्यांची वेळ तुमच्या हातात असते का ?  पुढे अस आहे की , तुम्ही कर्म केल्यावर त्याचा संस्कार तुमच्या मनावर राहतो . कोणतही कर्म केल्यावर हा संस्कार तुमच्या अंतर्मनामध्ये जातो. फ्राँइडचं म्हणणं अस की , माणसाच व्यक्तीमत्त्व त्याच्या पहिल्या तीन वर्षातच ठरून जात ते संस्कार त्याच्या मनामध्ये असतात . हे अनुभवाला कस येत तर वृत्तीरुपाने अनुभवाला येतं. माणूस जर बदलायचा असेल तर , त्याची वृत्ती बदलायला पाहिजे . ही वृत्ती बदलणं म्हणजे योग आहे .म्हणून कर्मानंतर योग.आपल्याला आतून बदलायला पाहिजे असेल , भगवंताच स्मरण ठेवायला जे काही आड येतं आपल्या वृत्ती मध्ये असतं. ती वृत्ती बदलायला पाहिजे .म्हणून महाराज नेहमी सांगायचे वृत्ती बदला , वृत्ती बदला .आणि वृत्ती बदलायला भगवंताच स्मरण हाच उपाय असल्यामुळे , दुसरी वृत्ती आली की  तिच्या तोंडी नाम द्या अस ते म्हणत असत . आता वृत्ती म्हणजे काय ? आपलं मन समुद्रासारखं खोल आहे , गंभीर आहे त्यातून जे स्फुरण येतं ना ती वृत्ती . हे स्फुरण का येत तर आतमधे वासना असते ती सुप्त असते ,सूक्ष्म असते , ती जेव्हा दृश्यात येते तेव्हा जो तरंग येतो त्याचं नाव वृत्ती . आपण पहिल्यांदा आपल्या मनात काय येतं आहे हे बघायला शिकलं पाहिजे . या वृत्तीला काही बंधन नाही आपण स्वस्थ बसलो की , ती येते . हि वृत्ती सूक्ष्म तरल आहे . काय झालं कि , कोणती वृत्ती येईल त्याला काही नेम नाही .म्हणून योगाची व्याख्या पतंजलीने जी केली आहे - ' योग:चित्तवृत्ती निरोध: ' या वृत्ती येतात त्या आवरणं , निरोधन हा योग आहे . हे सार आम्हाला हि नव्हतं माहित पण फक्त गुरूचरणांचा आश्रय म्हणून मागील वर्षी ऐसी अक्षरे रसिके मेळवींन या समारोहा दरम्यान पूज्य श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी माऊलींच्या मोगरा फुलला या अभांगावरील चिंतन मांडले होते . त्यात श्रीगुरुदेवांनी मोगऱ्याच्या चार पाकळ्या सांगितल्या होत्या कर्म ज्ञान योग आणि भक्ती . त्यातील योगाचा विचार आपण आता पाहिलात . बरोबर आहे ते सार पूज्य श्रीगुरूंचे . लिखाणात कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व . जागतिक योग दिना निम्मित हार्दिक शुभेच्छा !

- varkariyuva.blogspot.in