Sunday 19 June 2016

सौ. वीणा खाडिलकर यांना " विश्वकर्मा युनिवर्सिटी " च्या वतीने डाॅक्टरेट प्रदान...!

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.सौ.वीणा त्यागराज खाडिलकर यांना त्यांच्या अध्यात्म आणि पारमार्थिक साधनेतील  भरीव योगदानासाठी दिल्लीतील विश्वकर्मा युनिवर्सिटी च्या वतीने "डाॅक्टरेट " प्रदान करण्यात आली आहे .                    
                 " स्पिरिच्युअल एज्युकेशन " या विषयातील  डाॅक्टरेटही सर्वोच्च पदवी प्राप्त करणार्‍या त्या देशातील पहिली व्यक्ति ठरल्या आहेत ....! ह.भ.प. सौ. वीणा यांना माहेर च्या अपामार्जने घराण्याकडून तीन पिढ्यांच्या कीर्तन परंपरेचा वारसा लाभला आहे. नारदीय आणि वारकरी अशा दोन्ही शैलीमधून कीर्तन करणार्‍या व शिकविणार्‍या त्या एकमेव महिला कीर्तनकार  आहेत .व हिंदी व मराठीतून आपली कला सादर करणार्‍याहि त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. संस्कृत बी.ए.(B .A.),संगीत एम् .ए.(M.A.) त्यांनी केले आहे .अनेक संत, चरित्रांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, अनेक क्रांतिकारक तसेच महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनवर ही त्या कीर्तन सादर करतात ." अनेकसामाजिक विषयांवर कीर्तनातून त्या वक्तव्य प्रबोधन  करतात.  मोक्षा आर्टस् " या सांस्कृतिक कार्यक्रम करणार्‍या ,संस्थेच्या त्या " मॅनेजींग डिरेक्टर " आहेत . संगीत, नृत्य, नाटक, आणि कीर्तना चे अनेक भव्य सोहळे त्यांनी आयोजित केले आहेत.तसेच "मला वेड लागले संतांचे " या अध्यात्मिक ,नितांत सुंदर अशा संगीत नाटकाची निर्मिती केली आहे .महाराष्ट्र शासन आयोजित संचालक म्हणून कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत त्यांनी अनेक युवा कीर्तनकार घडवले आहेत .                              " स्पिरिच्युअल एज्युकेशन " या विषयातील डाॅक्टरेट प्राप्त झाल्याने, कीर्तन कलेचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारत व जगभरात करण्यासाठी त्यांचा  उत्साह व्दिगुणित झाला आहे ...!
       
 आदरणीय वीणाताई आपले  अध्यात्म  क्षेत्रातील नवनवीन कल्पना व धेयपूर्ती  पूर्ण होवो ही  ईश चरणी प्रार्थना...!   आपणास भविष्यातील कार्याकरिता खूप खूप शुभेच्छा ! 

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र