Sunday 15 December 2013

तेचि संत तेचि संत - बाबामहाराज सातारकर

तेचि संत तेचि संत
- बाबामहाराज सातारकर


जगद्गुरू तुकोबारायांचा महिमा वाढवण्याकरता
श्रीहरीने वह्या तारण्याचा चमत्कार घडवून आणला .
निळोबा महाराज संतांची लक्षणे सांगताना म्हणतात ,
तेचि संत तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठलीं।
नेणती कांहीं टाणाटोणा। नामस्मरणावाचुनी।।
टाणाटोणा करतात , अंगारा , धुपारा देतात ,
त्यांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेत कोठेच स्थान
नाही ; कारण इतर मंडळींची साधना ही केवळ
रिद्धीसिद्धी प्राप्तीकरता असते आणि त्या
रिद्धिसिद्धीच्या आधारे लोकांच्या वर वर्चस्व
स्थापून त्यांचे शोषण करणे हाच त्यामागील हेतू दिसतो
. त्यात लोककल्याणाचा अभावच दिसून येतो आणि
म्हणूनच या रिद्धीसिद्धीचा उपयोग काही
काळापर्यंतच होतो , मग त्यांचे सत्त्व कमी कमी होत
जाते . पुण्याची पाउटी सरल्यानंतर जसे स्वर्गातून
खाली हाकलून दिले जाते , तसे रिद्धिसिद्धीचा
अनाठायी उपयोग केल्यामुळे त्यांचे सत्त्व कमी होते .
मग लोकांना उलटे अनुभव येऊ लागतात . त्यामुळे ते म्हणू
लागतात , महाराजांकडे पूवीर् ताकद होती . पण आता
काही तसे शिल्लक राहिले नाही . म्हणून प्राप्त
झालेल्या शक्तीचा कशासाठी उपयोग करायचा हे जर
कळले नाही तर ज्या रिद्धिसिद्धीने त्यांना यश
प्राप्त झाले , तीच रिद्धिसिद्धी त्यांच्या नाशाला
कारणीभूत होते .
जारण - मारण , उच्चाटण करणारे मांत्रिक सूर्यग्रहण
, चंदग्रहण या काळात खूप कठोर साधना करत असतात
. त्यांच्या मनासारखा मोबदला त्यांना मिळाला की ,
ज्या व्यक्तीचा आपला संबंध नाही , त्याचे वाईट
करायला ते मागेपुढे पाहत नाहीत . पण अशा
माणसांचा शेवट अत्यंत वाईट होतो , अशी कित्येक
उदाहरणे पाहायला मिळतात . पण संत जी नामसाधना
करीत असतात ती सर्वश्रेष्ठ असल्यामुळे रिद्धिसिद्धी
त्यांच्या दारात हात जोडून उभ्या असतात .
आवडेल जीवा जीवाचिये परी। सकळा अंतरीं एक भाव।।
तुका म्हणे कृपा केली नारायणें। जाणिजे तें येणें अनुभवें।।
रामेश्वरभटांनी तो अभंग हातात घेतल्याबरोबरच ,
त्यांची निम्मी व्यथा कमी झाली आणि अभंगातील '
होतील शीतळ अग्निज्वाळा ' हे चरण वाचल्याबरोबर
त्यांच्या अंगाचा संपूर्ण दाह कमी झाला आणि त्यांना
अंतर्बाह्य शीतलता प्राप्त झाली . हा आगळावेगळा
अनुभव रामेश्वरभटांनी स्वत : च अतिशय प्रांजळपणे
आपल्या अभंगात व्यक्त केला आहे . तो मुळातूनच
पाहण्यासारखा आहे . ते सांगतात ,
माझी मज आली रोकडी प्रचित। होऊनि फजित दु : ख
पावें।।
कांहीं द्वेष त्याचा करितां अंतरीं। व्यथा या शरीरीं
बहुत जाली।।
ज्ञानेश्वरें मज केला उपकार। स्वप्नीं सविस्तर
सांगितले।।
तुका सर्वांश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर। कां जे अवतार
नामयाचा।।
त्याची तुज कांहीं घडली रे निंदा। म्हणोनि हे बाधा
घडली तुज।।
आतां एक करी सांगेन तें तुला। शरण जाई त्याला
निश्चयेशीं।।
दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार। होय तो विचार
सांगितला।।
तोचि हा विश्वास धरूनि मानसी। जाय कीर्तनासी
नित्यकाळ।।
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें। जालें हे आराम देह
माझें।।
अंगाचा दाह अशा प्रकारे शमल्यानंतर रामेश्वरभट
तुकोबारायांच्या दर्शनाला निघाले . तुकोबारायांना
हे कळल्यानंतर महाराज स्वत : होऊनच त्यांना
भेटण्यासाठी निघाले . महाराजांचे मन किती निर्मळ ,
मृदुमधुर , द्वेष - मत्सररहित होते याची साक्ष या
घटनेतून सहज पटावी . महाराजांना वाटले रामेश्वरभट
उच्चवणीर्य , विद्वान ब्राह्माण . मग त्यांनी
आपल्यासमोर यावे आणि दहा माणसांत शरण येऊन आपले
पाय धरावे हे योग्य होणार नाही . तेव्हा आपणच
गावाबाहेर जाऊन त्यांना भेटावे .
अर्ध्या रस्त्यांतच रामेश्वरभटांची व तुकोबारायांची
भेट झाली . महाराजांना पाहून त्यांचा सूक्ष्म असा जो
वर्णाभिमान तोही पूर्ण नाहीसा झाला आणि त्यांनी
महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले . तेव्हा
ते म्हणाले , '' तुकोबाराय , आपण पांडुरंगाचे श्रेष्ठ
भक्त असून , महावैष्णव आहात . '' तुकोबाराय म्हणाले ,
'' मला काही कळत नाही . मी हीन यातीमध्ये , हीन
कुळात जन्माला आलो . '' त्या वेळी रामेश्वरभट म्हणाले
, '' वैष्णवाची याती वाणी जो आपण। भोगी तो पतन
कुंभपाकीं। ' ते पुढे म्हणतात ,
उंच निच वर्ण न म्हणावा कोणी। जें का नारायणीं
प्रिय जालें। चहूं वर्णांसी हा असे अधिकार। करिता
नमस्कार दोष नाहीं। आणि शेवटी सांगतात , ' म्हणे
रामेश्वर नामीं जे रंगले। स्वयेंचि ते जाले देवरूप। ' त्या
वेळेस तुकोबारायांचे चरण धरून रामेश्वरभटांनी त्यांची
खूप स्तुती केली व उर्वरित आयुष्य तुकोबारायांच्या
संगतीतच काढण्याचा निश्चय त्यांनी केला