Sunday 15 December 2013

कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना पैठण धर्मसभेत दिलेलं शुद्धी पत्रक

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

सर्वाना सांगण्यास आनंद होतो कि कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना पैठण धर्मसभेत दिलेलं शुद्धी पत्रक आपल्या पुढे सादर करत आहे. त्यातील मजकूर जसा आहे अगदी तसाच  
सदरहू शुद्धी पत्रक पैठण येथील ब्राह्मण सभेत देण्यात आले , त्या ब्रह्मसभेचे मुख्य अध्यक्ष दशग्रंथी विद्व्दवरीयान बोपदेव नावाचे मोठे पंडित होते . यांचा परिचय असा कि विदर्भात वर्धा नदीच्या काठी वेदपद गावी यांचा जन्म झाला . त्यांच्या वडिलांचे नाव केशवपंत व आजोबांचे नाव महादेव होते . बोपदेवांच्या वडिलांनी सिद्धमंत्र नावाचा ग्रंथ लिहिला व त्याच्यावर बोपदेवांनी सिद्धप्रकाश नावाची टीका लिहली . बोपदेवांनी एकंदर 26 ग्रंथ केले ते असे व्याकरणावर दहा (१० ), वैदिकावर नऊ (९) , जोतीषावर एक (१) ,साहित्यावर तीन (३) , व भागवत तत्वावर तीन (३) . अशा या महान विद्वान प्रकांडपंडिताने निवृत्तिनाथ , ज्ञानदेव , सोपानदेव , मुक्ताबाई यांना शुद्धी पत्रक दिले . शुद्धी पत्रामध्ये प्रास्ताविक ( भाग एक ) ,श्लोक ( भाग दोन) , आर्या ( भाग तीन ), श्लोक ( भाग चार ) एकून यात २५ श्लोक आहेत . त्यापैकी प्रास्ताविक जे आहे अर्थात भाग एक आज माऊली कृपेने आपल्या पुढे सादर करतोय .... शुद्धी पत्रक माझ्या वाचनात आल ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प .गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या ब्रह्मचित्कला या ग्रंथात त्यांनी संपूर्ण शुद्धीपत्रकाचा मजकूर दिला आहे . सर्वांन पर्यंत हि गोष्ट पोहचावी या करिता हा छोटा प्रयत्न . माउली आपल्या या लेकराकडून कार्य करवून घेत आहेत फारच आनंद होत आहे . लवकरच पुढील भाग हि आपल्या समोर येतील ....
संतचरणरज अक्षय भोसले .